Brahmansabhaambernath

Who are we?

ABOUT US

ब्राह्मण सभा, अंबरनाथ या संस्थेची स्थापना दिनांक 18 मे 1935 या दिवशी झाली 6 वर्षे कार्य केल्यानंतर तत्कालीन काही कारणांमुळे सन 1941 ते 1965 वर्यंत संस्थेने कार्य बंद पडले. त्यानंतर ब्राह्मण सभा (नवीन) या नावाने संस्थेच्या कार्यास सुरुवात झाली व कालांतराने दिनांक 25 फेब्रुवारी 1968 या दिवशी जुनी ब्राह्मण सभा व ब्राह्मण सभा (नवीन) या दोन्ही संस्थांचे एकत्रीकरण होऊन ब्राह्मण सभा, अंबरनाथ असे या संस्थेचे नामकरण करण्यात आले त्यानंतर संस्थेची घटना तयार करून दिनांक 19 एप्रिल 1976 या दिवशी माननीय सहाय्यक धर्मदाय आयुक्त, ठाणे यांचे कार्यालयात संस्थेची रीतसर नोंदणी करण्यात आली. संस्थेच्या आवारात श्री दत गुरूचे मंदिर आहे तसेच दोन सुसज्ज मंगल कार्यालये आहेत.